60 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून ; कर्जत तालुक्यातील घटना

कर्जत =तालुक्यातील गायकरवाडी येथे 60 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गायकरवाडी येथे राहणारे गोरख विठोबा वाघमारे यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यावर लोखंडी रॉड किंवा तत्सम कठीण वस्तूने वार करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना गुरुवारी घडली असावी, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी शेजारील व्यक्ती गोरख वाघमारे यांना आवाज देण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता, ते घरामध्ये जखमी अवस्थेत पडलेले आढळले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असता वाघमारे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी भेट दिली असून श्वान पथक, ठसे तज्ञांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या घटनेमुळे गायकरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles