मनपा कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण;पोलीस अधीक्षकांकडून संवेदनशील भागांची पाहणी

मनपा कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण; पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका यांच्याकडून शहरातील विविध भागांची पाहणी

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका यांनी शहरातील विविध संवेदनशील भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका यांनी शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग, बाजारपेठ परिसराची पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविणे, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची अफवा पसरू न देणे तसेच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे, अशा विविध सूचना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी तसेच कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles