अहिल्यानगर शहरात प्रगत विद्यालयाच्या लिपिकाविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर -येथील गांधी मैदान परिसरातील प्रगत विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक आणि शैक्षणिक फसवणूक केल्याप्रकारणी विद्यालयाचा लिपिक लुहाण लक्ष्मण पहिलाजरॉय याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सर्जेपुरा येथील किराणा व्यावसायिक अमोल टिल्लु गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी लिपिकाने फिर्यादीचा मुलगा आणि इतर चार विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्याकडून बारावी बोर्ड एटीकेटी परीक्षेचे शुल्क रोख स्वरूपात गोळा केले होते. मात्र, सदर रक्कम ऑनलाइन पद्धतीने बोर्डाकडे जमा न करता, एकूण ३ हजार १५० रुपयांचा अपहार केला.
यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गायकवाड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी लुहाण पहिलाजरॉय विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

—————————————————————————–

फोन करण्याच्या बहाण्याने हॉटेल चालकाला लुटले
अहिल्यानगर: शहरातील काटवन रेल्वे स्टेशन रोडवरील गायके मळा परिसरात एका हॉटेल चालकाला गाठून चार अनोळखी चोरट्यांनी २८ हजार ३७६ रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल रावसाहेब भोर (वय ३२, रा. चास, अहिल्यानगर) यांचे चास येथे चुल मटन रस्सा नावाचे हॉटेल आहे. १५ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विशाल भोर हे गायके मळा परिसरातून जात होते. त्यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ येत मला तातडीचा फोन करायचा आहे, तुमचा मोबाईल द्या अशी विनंती केली. भोर यांनी विश्वासाने आपला मोबाईल फोन त्याच्या हातात दिला.त्या इसमाने मोबाईल कानाला लावून बोलण्याचा बहाणा केला आणि दबा धरून बसलेल्या दुसर्‍या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून तो पळून गेला. विशाल भोर काही समजण्याच्या आतच आणखी एक अनोळखी इसम मोटारसायकलवर तिथे आला. मचला, मी तुम्हाला चोर कुठे गेले ते दाखवतो असे सांगून त्याने भोर यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे चार अनोळखी आरोपींनी संगनमत करून विशाल भोर यांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि फोन पे खात्यावरील २ हजार ८७६ रुपये, असा एकूण २८ हजार ३७६ रुपयांचा माल फसवणूक करून चोरून नेला. या घटनेनंतर विशाल भोर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles