विमान अपघातात अजित पवार यांचे निधन ;अजित पवारांच्या अपघाताविषयी गुन्हा दाखल

विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि बारामती पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर सोमवारी (ता. २३ मार्च) पहिला गुन्हा दाखल झाला आहे.कर्नाटकातील बेंगलुरू शहरातील हाय ग्राऊंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी झिरो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या फिर्यादीनुसार, झिरो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६१, १०३, १०५, १०६ १२५, २३८ आणि ३३६(२) या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे हा एफआयआर पाठविण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. आता त्यानुसार महाराष्ट्रात गुन्हा दाखल होऊन त्यानुसार तपास होणार का, असा प्रश्नही रोहित पवारांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला. कर्नाटकातील पोलीस प्रशासन अजितदादांना न्याय देण्यासाठी सरसावत आहे. पण महाराष्ट्रातील पोलीस न्याय देऊ शकत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले.

कर्नाटक पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी 66 पानांची कागदपत्रे दिले आहेत. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने कर्नाटकात जावे लागल्याचे रोहित पवारांनी सांगितले. झिरो एफआयआरमध्ये आरोपी म्हणून वैयक्तिक कुणाचेही नाव घेण्यात आलेला नाही. सर्व संबंधित व्यक्ती असे त्यामध्ये म्हटले आहे.

झिरो एफआयआरमध्ये म्हटले आहे की, तक्रारदार रोहित पवार हे यापूर्वी मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्य अँगलने तपास केला जात असल्याने या प्रकरणाचा स्वतंत्रपणे क्रिमिनल तपास व्हावा, यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना म्हणजे गुन्हेगारी षडयंत्र असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles