वीज चोरी करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हे; महावितरणची नगर तालुक्यात कारवाई

वीज चोरी करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हे; महावितरणची शेंडी शिवारात कारवाई

अहिल्यानगर,शेंडी (ता. अहिल्यानगर) गावच्या शिवारात महावितरण कंपनीकडून वीज चोरीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेली वीज चोरी उघडकीस आणली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपासणीत चोरी उघड
महावितरणच्या शेंडी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सुहास सखाराम शिंदे (वय 35, रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात शनिवारी (13 जून) फिर्याद दिली आहे. महावितरणच्या पथकाने 28 एप्रिल ते 13 जून दरम्यान शेंडी गावात केलेल्या तपासणीत संशयितांनी मुख्य वीज वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज चोरी केल्याचे समोर आले.

सात संशयितांवर गुन्हे
यामध्ये पंदरीनाथ उत्तम कराळे, साहेबराव मधाजी दाणी, तुकाराम शंकर भगत, किरण राजेंद्र दाणी, नामदेव गजानन दाणी, भीमराज बाळासाहेब शिंदे आणि पोपट बाळासाहेब दाणी यांनी मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व संशयितांनी गेल्या काही महिन्यांत घरगुती आणि इतर वापरासाठी महावितरण कंपनीचे हजारो युनिटचे नुकसान केले होते.

त्यांना महावितरणकडून वीज चोरीचे देयक भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी ते भरले नाही. म्हणून कनिष्ठ अभियंता शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी विद्युत कायद्यानुसार सातही संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles