Wednesday, November 12, 2025

महावितरणच्या गलथान कारभारामुळे नगर कल्याण रोड परिसरातील नागरिक एक महिन्यापासून त्रस्त!

कल्याण रोड परिसरात होल्टेज कमी-जास्तीमुळे नागरिकांच्या घरगुती वस्तूंचे नुकसान
महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक एक महिन्यापासून त्रस्त!
तातडीने विजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन -दत्ता गाडळकर
नगर (प्रतिनिधी)- कल्याण रोड परिसरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या गलथान कारभारामुळे सतत कमी-जास्त होणाऱ्या वीज होल्टेजच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. या समस्येमुळे परिसरातील अनेक घरांमध्ये पाण्याच्या मोटारी, पंखे, संगणक, टीव्ही व इतर इलेक्ट्रिकल वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे दत्ता गाडळकर यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विशाल खैरे, विजय गायकवाड, सुरेश लालबागे आदी उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांनी या प्रश्‍नाची तात्काळ दखल घेत दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठवले असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, हा प्रश्‍न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना सतत होणाऱ्या कमी-जास्त होल्टेजमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा मिळणे आवश्‍यक असून, दररोज सकाळी या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्युत महावितरणने हा प्रश्‍न तात्काळ मार्गी न लावल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाणार. -दत्ता गाडळकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles