अहिल्यानगर-दिल्लीगेट परिसरातील म्युन्सिपल कॉलनीत गुरूवारी (24 जुलै) दुपारी दोन गटांत राडा झाला. यात महिलांसह तरूण जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याचे सांगितले जात असून यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.गुरूवारी दुपारच्या सुमारास म्युन्सिपल कॉलनीत पवार-रोहकले हे दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात हाणामारीची घटना होऊन वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाकडून दुकानावरही दगडफेक करण्यात आली. हाणामारीत दोन्ही गटांतील महिलांसह तरूण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, या वादातील काही लोकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचाकडे तक्रार केली. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


