महाराष्ट्रात आमदाराला 20 कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्यानं केली ऑफरची पोलखोल

काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना कथितपणे 20 कोटी रुपयांची ऑफर

या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली

धीरज लिंगाडे यांनी राऊत यांच्या दाव्यानंतर माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला.सहा खासदारांचा बंडामुळे राज्यातील राजकारणासह देशात खळबळ उडाली होती. आता शिंदे पुन्हा ऑपरेशन टायगर राबवत उद्धव ठाकरेंचे आमदार फोडणार असल्याची चर्चा आहे. आमदारांना फोडण्यासाठी कोटी कोटी रुपयांची ऑफर दिली जातेय, असा धक्कादायक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केलाय.
काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांना २० कोटींची ऑफर आल्याचा दावा राऊतांनी केला होता.

राऊतांच्या दाव्यानंतर आमदार लिंगाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राऊतांच्या दाव्यानंतर ठाकरे गटानंतर काँग्रेसमध्येही बंडखोरी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. धीरज लिंगाडे म्हणाले की, आपल्याला आलेली ऑफरची माहिती आज सकाळी समजली. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्याच्या विधानाचे आपल्याला आश्चर्य वाटत असून ते जे काही बोलले ते पूर्णपणे खोटे आहे.

अशी कोणतीही ऑफर आली नाही. माझ्या संदर्भात जो काही दावा करण्यात आला तो खोटा आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आली नाहीये. मी रूग्णालयात देखील भरती नाही, असे स्पष्ट शब्दात धीरज लिंगाडे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. राऊतांच्या दाव्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली पहिली प्रतिक्रिया दिली. मात्र, आमदार धीरज लिंगाडे यांनी अशी कोणताही ऑफर नसल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles