भुईकोट किल्ला संवर्धन कामांचा डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतला आढावा

भुईकोट किल्ला संवर्धन कामांचा डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतला आढावा
मंजूर आराखड्याची माहिती घेत प्रत्यक्ष जागेची केली पाहणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहरालगतच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी मंजूर कामांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून मंजूर कामांच्या आराखड्याची माहिती घेत त्यांनी जागेवरच आढावा घेतला.

डॉ. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत किल्ल्याच्या विविध भागांची पाहणी करत प्रस्तावित कामांची रचना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, परिसर नियोजन आणि पर्यटक सुविधांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आराखड्यातील कामांची प्रत्यक्ष जागेशी सांगड घालत आवश्यक बदल व सुधारणांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना केल्या. ऐतिहासिक वारशाचे मूळ स्वरूप जपतच नियोजन करावे, यावर त्यांनी भर दिला.

भुईकोट किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाल्यानंतर लष्करी प्रशासनासोबतचा सामंजस्य करार (MOU) हा महत्त्वाचा टप्पा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे हा MOU पूर्ण झाला असून आता मंजूर आराखड्यानुसार पुढील प्रक्रिया मार्गी लागली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

किल्ल्याशी संबंधित ऐतिहासिक वास्तू, स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भांचे जतन करून ते नव्या पिढीसमोर मांडण्याचे नियोजन आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सह सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भांनाही उजाळा मिळणार आहे.

यावेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles