तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, …गुटखा माफियांवर होणार मकोका अंतर्गत कारवाई, लूटमार करणाऱ्या हॉस्पिटल्सकडे मोर्चा वळवला

रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठा दणका दिला आहे. “रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधे कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा अधिकार आहे,” असा महत्त्वपूर्ण आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, “बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशा तक्रारी येतात आणि माहिती मिळते की, हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असेल, तर त्याला लागणारी औषधे त्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधून घेण्याची सक्ती केली जाते. परंतु, कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना अशी सक्ती करू शकत नाही. बाहेरून औषधे आणणे हा रुग्णाचा वैयक्तिक चॉईस आहे. तुम्ही कोणावरही सक्ती करू शकत नाही. औषध कुठून खरेदी करायचे, हा नागरिक आणि पेशंटचा मूलभूत अधिकार आहे.”

राज्यातील गुटखा माफियांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध वापाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे. यामधून कोणाचीही सुटका होणार नाही, असा इशाराच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. गोदाम चालक आणि घाऊक तसेच किरकोळ विक्रेतेही एफडीएच्या रडावर असणार आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार आता संघटित गुन्हा मानला जाणार आहे, जर अशा अन्नपदार्थांचा व्यापार कोणी करत असेल तर त्याच्यावर आता थेट मकोका अतंर्गत कारवाई होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles