NEET-२०२६ National Testing Agency (NTA) ने ३ मे रोजी झालेली NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क (Exam Fee) १००% परत देण्याचा निर्णय घेतला आहे. NTA ने यासाठी अधिकृत वेबसाईटवर फी रिफंड पोर्टल (Fee Refund Portal) सुरू केले आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील अनेक विद्यार्थी नेट कॅफे किंवा इतर व्यक्तींच्या खात्यावरून पैसे भरतात, त्यामुळे पैसे चुकीच्या खात्यात जाऊ नयेत म्हणून NTA थेट पैसे रिव्हर्स न करता विद्यार्थ्यांकडून बँक खात्याची माहिती स्वतः मागवून घेत आहे. तुम्हाला तुमचे शुल्क परत मिळवण्यासाठी २७ मे २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) ऑनलाईन पद्धतीने बँक खात्याची माहिती सादर करणे बंधनकारक आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्याची सूचना आहे. NTA च्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जा. तुमचा NEET-UG २०२६ चा ॲप्लिकेशन नंबर (Application Number) आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून लॉगिन करा.रिफंड लिंकवर क्लिक करा. डॅशबोर्ड लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर ‘Fee Refund Window for NEET(UG) – 2026’ किंवा ‘Refund Link’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.बँक खात्याचा तपशील भरा.
बँक तपशीलात चूक होऊ नये म्हणून तुम्ही ‘Cancelled Cheque’ किंवा पासबुकचा फोटो स्कॅन करून अपलोड करू शकता (हे बंधनकारक नाही, ऐच्छिक आहे). फॉर्म सबमिट करा. पावती सेव्ह करा.
२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या पुनरपरीक्षेला (Re-Exam) बसणार असाल, तरीही तुम्हाला हा रिफंड मिळणार आहे.


