Tuesday, October 28, 2025

काँग्रेसला मोठा धक्का, ठाकरेंच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यात काँग्रेसला गळती लागली आहे असे म्हटले जात आहे. विदर्भात काँग्रसला आणखी एक धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमधील नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे वरूड-मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे. यामुळे विदर्भामध्ये पुन्हा एकदा भाजपने काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे हे मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात होते. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विक्रम ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठीची इच्छा व्यक्त केली होती. पण उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विक्रम ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. आज (१६ ऑगस्ट) अखेर विक्रम ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles