Tuesday, November 11, 2025

अहिल्यानगर पुणे रोडवर वाहन चालकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी जेरबंद

अहिल्यानगर-पुणे हायवे रोडवरील वाहन चालकांना कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी, 3 विधीसंघर्षीत बालक
स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, आरोपींकडुन सुपा येथील जबरी चोरीचे 3 गुन्हे उघड

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा.श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक, किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोहेकॉ/ विष्णु भागवत, पोहेकॉ/ गणेश लोंढे, पोना/ भिमराज खर्से, पोना/ रिचर्ड गायकवाड, पोकॉ/बाळु खेडकर, पोकॉ/भाऊसाहेब काळे, पोकॉ/मनोज साखरे, पोहेकॉ/फुरकान शेख, पोकॉ/ प्रशांत राठोड व चालक अरुण मोरे, सुपा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, ज्योती गडकरी यांनी पोसई मंगेश नागरगोजे, पोलीस अंमलदार मेघराज कोल्हे, योगेश सातपुते यांचे पथक तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.

त्यानुसार सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं.323/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना पोनि किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत तसेच व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहीती मिळाली की, सदर चा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे 1) यश भाऊसाहेब शिरसाठ रा.गांधीनगर बोल्हेगाव ता. जि. अहिल्यानगर याने त्याच्या साथीदारांसह केला असुन, तो सध्या गांधीनगर बोल्हेगाव, अहिल्यानगर येथे त्याचे साथीदारांसह बसलेले असल्याची माहिती मिळाली. पोनि किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ पोलीस पथकाने सदर ठिकाणी पाठवुन खात्री केली असता तेथे बातमीतील माहिती प्रमाणे काही इसम मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) यश भाऊसाहेब शिरसाठ, वय 20 वर्षे, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 2) अथर्व रमेश सुर्यवंशी वय 19 वर्षे, रा.नवनाथनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर, 3) विधीसंघर्षीत बालक वय 17 वर्षे, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 4) साहील अतिफ शेख वय 21 वर्षे, रा.बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 5) विधीसंघर्षीत बालक वय 17 वर्षे, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि. अहिल्यानगर 6) विधीसंघर्षीत बालक वय 17 वर्षे, रा. शिवाजीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर, 7) विशाल बाबासाहेब पाटोळे, वय 20 वर्षे, रा. गांधीनगर बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर असे सांगीतले.

आरोपी नामे यश भाऊसाहेब शिरसाठ याचेकडेस सुपा पोस्टे गु र नं 323/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2) या गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सदर गुन्हा तो तसेच 2) अथर्व रमेश सुर्यवंशी, वय 19 वर्षे, रा. नवनाथनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर, 3) विधीसंघर्षीत बालक, वय 17 वर्षे, रा. गांधीनगर बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 4)विधीसंघर्षीत बालक वय 17वर्षे, रा.शिवाजीनगर बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 5) अदित्य लुकास भोसले, रा.गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर (फरार) 6)चेतन संतोष सरोदे, रा.गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर (फरार) अशांनी मिळुन केला असल्याचे सांगीतले आहे. तसेच यश शिरसाठ यास विश्वासात घेवुन त्याचेकडे आणखी गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता, त्याने सांगीतले मागील तीन ते चार दिवासापुर्वी आम्ही सर्वांनी मिळुन सुपा गावचे शिवारात अहिल्यानगर ते पुणे रोडवर एका मोटारसायकल चालक लघुशंकेसाठी थांबलेले असतांना, त्यास दमदाटी करुन त्याचे ताब्यातील टी.व्ही. एस. कंपनीची स्पोर्ट मोटारसायकल तसेच त्याचेकडील एक पिशवी असे बळजबरीने घेवुन आलो होतो असे सांगीतले.

तसेच आरोपी नामे 1) यश भाऊसाहेब शिरसाठ याचेकडे आणखी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याने त्याचे साथीदार नामे 2) साहील अतिफ शेख वय 21 वर्षे, रा.बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 3) विशाल बाबासाहेब पाटोळे, वय 20 वर्षे, रा. सदर 4) विधीसंघर्षीत बालक वय 17 वर्षे, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 5) नयन दादु पाटोळे, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर (फरार) 6) प्रेम राजु नायर रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर (फरार) अशांनी आम्ही दि. 25/08/2025 रोजी रात्री 02/00 वा. चे सुमा. अहिल्यानगर ते पुणे जाणारे रोडवरील सुपा टोलनाक्या जवळील म्हसने फाटा येथे रोडचे कडेला उभा असलेल्या ट्रक मधील चालकास कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन त्याचे ताब्यातील मोबाईल फोन, रोख रक्कम बळजबरीने चोरलेबाबत कबुली दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles