नगर तालुक्यात गोदरेज कंपनीच्या लाखो रुपयांची अफरातफर ; गुन्हा दाखल

अहिल्यानगर -शहरानजीकच्या वडगाव गुप्ता (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका गोडाऊनमधून गोदरेज कंपनीच्या दोन लाख 77 हजार 311 रूपयांच्या मालाची दोघांनी अफरातफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत व्यावसायिक वैभव चंद्रकांत मचाले (वय 45, रा. आनंदनगर हौसिंग सोसायटी, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी शनिवारी (28 मार्च) फिर्याद दिली आहे. सदरची घटना 1 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान घडली आहे. अंबादास शंकर दराडे (रा. सांगवी खुर्द, पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी) वाहन चालक देविदास तुकाराम साबळे (रा. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादी वैभव मचाले यांचे शेंडी बायपास रस्त्यावर वडगाव गुप्ता शिवारात गोडाऊन आहे. या ठिकाणाहून अंबादास दराडे आणि वाहन चालक देविदास साबळे यांनी संगनमत करून मालाची विल्हेवाट लावली.

1 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या काळात हा प्रकार घडला. संशयित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या वाहनाचा वापर करून विविध प्रकारचे साबण, अगरबत्ती, कीटकनाशके आणि प्रसाधने असा एकूण दोन लाख 77 हजार 311 रूपयांचा माल परस्पर लंपास केला. साठ्याची तपासणी केली असता हा मोठा अपहार उघडकीस आला. यानंतर मचाले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार नरोटे करीत असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles