सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरी! थेट १४,००० रुपयांने स्वस्त होणार सोनं? केंद्र सरकारच्या एका निर्णयाने उडाली खळबळ

सोनं खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि सराफा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या विचार करत आहे. सरकारने आयात शुल्क कमी केले तर भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत एकाच झटक्यात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार आयात शुल्क १५ टक्क्यांवरून थेट ६ टक्क्यांवर आणू शकते. त्यामुळे प्रति १० ग्राम सोन्याच्या दरात १४,००० रुपयांपेक्षा जास्त कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.देशातील परकीय चलन साठा जपण्यासाठी आणि वाढत्या आयात बिलावर नियंत्रण मिळवण्यासाठी मे महिन्यात सरकारने सोन्यावरील कस्टम इम्पोर्ट ड्युटी वाढवून १५ टक्के केली होती. मात्र, आता बाजारपेठेतील परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे आणि आगामी सण-उत्सव तसेच लग्नसराईचा काळ लक्षात घेता, सरकार ही ड्युटी पुन्हा कमी करून ६ टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.

सध्या दिल्ली आणि प्रमुख शहरांतील सर्राफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे १,६३,००० ते १,६४,००० रुपयांच्या आसपास आहे. जर आयात शुल्कात ९ टक्क्यांची कपात झाली, तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ₹१४,००० हून अधिक घसरू शकतात. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति १० ग्रॅम ₹१३,००० ची कपात होऊ शकते. केवळ सोनेच नाही, तर या निर्णयाचा थेट परिणाम चांदीच्या दरावरही होणार असून चांदीचे भावही खाली येण्याची शक्यता आहे.भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदार देशांपैकी एक आहे. भारत आपल्या गरजेसाठी वर्षाला तब्बल ७०० ते ८०० टन सोने परदेशातून मागवतो. आयात शुल्क कमी झाल्यास परदेशातून सोने मागवणे स्वस्त होईल आणि बाजारात सोन्याचा पुरवठा वाढेल. आगामी सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles