Gold-Price: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे दर घसरले ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

४ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण

लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना दिलासा

२४ कॅरेट सोनं 15,092 रुपये प्रति ग्रॅम

चांदीचा दर 264.90 रुपये प्रति ग्रॅम

सोने आणि चांदीच्या दरांमध्ये या आठवड्यात मोठी हालचाल दिसून आली आहे. जागतिक बाजारातील बदल आणि देशांतर्गत मागणी-पुरवठा यांचा थेट परिणाम या किंमतींवर होत आहे. अशातच आज ०४ मे २०२६ रोजी, सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज सोमवार ४ मे २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,६४० तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३८,०८७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,४८,९०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,४८९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
दरातील ही घसरण जरी छोटी असली तरी मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ती फायदेशीर ठरत आहे. विशेषतः लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढत असताना दर कमी झाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा दर आणि मागणी-पुरवठ्याचे समीकरण यावर सोन्या-चांदीचे दर अवलंबून असतात. येत्या काही दिवसांतही दरात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी खरेदी करताना बाजारभावावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles