Gold-Price: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून बदल होत आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. परंतु आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १३१० रुपयांनी वाढले आहेत.इराण-अमेरिकेतील युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी सोन्याचे दर घसरत असल्याचे दिसत होते. त्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १३१० रुपयांनी महागले असून हे दर १,५८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १०४८ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२६,६८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १३,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १५,८३,५०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर १२०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४५,१५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ९६० रुपयांनी महागले असून हे भाव १,१६,१२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १२ हजारांची वाढ होऊन हे दर १४,५१,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर ९८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१८,७६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८४ रुपयांनी वाढले असून हे दर ९५,००८ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोनं ९,८०० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ११,८७,६०० रुपये झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles