सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा, लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिन, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं प्रत्येकाचचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात या दोन्ही धातूंनी जी उत्तुंग झेप घेतली होती, त्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं (खरेदीचं) स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका येत होती. सोनं-चांदीतील गुंतवणूक, खरेदी कमी करणयाचा आवाहन पतंप्रधान मोदी यांनी केल्यावरही देशात सोन्याची खरेदी सुरूच होती. मात्र वाढती महागाई आणि गगनाला भिडलेले भाव यामुळे खरेदीचा उत्साह कमी झाला होता. गेल्या काही दिवसांपसून सोन्याचे दर वायू वेगाने दौडत होते, मात्र आजा दरवाढीला ब्रेक लागला असून देशभरात आता सोन्याच्या दरातील वाढ थांबली आहे. २३ मे रोजी सकाळी त्यात घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २३ मे २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५९,०३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४५,७७८ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.


