शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी सुरू झाले आहे. त्यासाठी प्रवेश घेणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थांसाठी ही महत्वाची माहिती आहे. शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन प्रवेशाच्या नियमित फेरी १ च्या प्रक्रियेत मुदतवाढ केली आहे. आधी विद्यार्थ्यांना २२ मेपर्यंत नोंदणी करण्याची मुदर होती. या तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही ११ वीचा ऑनलाईन अर्ज २५ मे २०२६ पर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भरू शकता. आत्तापर्यंत १.१३ लाखांपेक्षा अधिक नोंदण्या झालेल्या आहेत. बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी अर्जाची मुदर आणखी वाढवली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजुनही अर्ज भरले नसतील तर ते आता भरता येणार आहेत. तर पहिल्या फेरीची सुरुवात २१ मेपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये २१ मे ते २३ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्जातील दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली होती.
नोंदणी करताना अनेकांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यात सर्व्हरवर लोड आला. या समस्येमुळे काही विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. म्हणून मुदत ३ दिवस वाढवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये प्रवेश संकेतस्थळावर मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी लॉगिन केल्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. तर दुसरीकडे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला. ११ वीच्या ऑनलाइन प्रवेशाचे शेवटचे दोन दिवस उरले असतानाच वेबसाईट ठप्प झाली. ही समस्या नंदुरबारमध्ये निर्माण झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र त्यासाठी २५ मेपर्यंत तारखा वाढवण्यात आल्या आहेत.


