Gold-Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण ,सोनं आजही स्वस्त,जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….

भारतीय सराफा बाजारात सोन्याचा आजचा भाव कमालीचा घसरला असून, जागतिक घडामोडींमुळे चांदीचा दर देखील मोठ्या प्रमाणावर गडगडला आहे. गेल्या काही दिवसांतील तेजीनंतर आता दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत असून ग्राह कांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षभर सोने खरेदी न करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मौल्यवान धातूंवर दुप्पट केलेले आयात शुल्क या सर्वांचा परिणाम आता सोने-चांदीच्या किमतींवर पाहायला मिळत आहे. दागिने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी आता चांगली संधी निर्माण झाली आहे.

इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, आज सोमवार, ८ जून २०२६ रोजी सोन्याची किंमत १८९० रुपयांनी कोसळली. आता २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १,५३,८७० रुपये इतका झाला आहे. सर्वकालीन उच्चांकापेक्षा १,८०,००० रुपयांपेक्षा सोने अजूनही सुमारे २७,००० रुपये स्वस्त मिळत आहे. दुसरीकडे चांदीच्या किमती ६१०० रुपयांनी आपटल्या. सध्या प्रति किलो चांदीचा दर २४३,०१० रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीत सतत घसरण पाहायला मिळत आहे. २९ जानेवारी २०२६ मध्ये चांदीने ४,००,७८० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. म्हणजे उच्चांकापेक्षा चांदी १,५७,७७० रुपये स्वस्त मिळत आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या किमती ३.३४ टक्के इतक्या घसरल्या असून एक तोळ्याचे दर तब्बल ५३२० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. दुसरीकडे चांदी तब्बल ९.१२ टक्के इतकी घसरली. म्हणजे आठवड्यात चांदीच्या किमती २४,३८० रुपयांनी घसरल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles