Gold-Price: खखुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….

आंतराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्ग परिस्थिती यामुळे सोने-चांदीच्या किमती सातत्याने घसरत आहेत. आज (१९ जून २०२६) सोने तब्बल २५८० रुपयांनी स्वस्त झाले. एक महिन्यानंतर सोन्याचे दर पुन्हा १,५०,००० रुपयांच्या खाली घसरले आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव ७१५० रुपयांनी कोसळला आहे. सर्वकालीन उच्चांकापेक्षा चांदी १,६८,४५० रुपयांनी खाली आली आहे. मौल्यवान धातू खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, देशातील सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याची किंमत १४७,०८० रुपये इतकी आहे. सोने आपल्या सर्वकाली उच्चांकापेक्षा तब्बल ३२ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याचे दर ३,००० रुपयांनी कोसळले आहेत. तर महिन्यात सोन्याचा भाव तब्बल १३,००० रुपयांनी कोसळला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला चंदेरी धातूने ४,०४,५०० रुपये प्रति किलोच्या विक्रमी भावाला स्पर्श केला होता. औद्योगिक मागणी अचानक वाढल्याने चांदीत तुफान तेजी आली होती. मात्र, मागील ४ महिन्यात चांदीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. चांदीची किंमत आज ७१५० रुपयांनी घसरुन २,३१,५५० रुपयांवर आली आहे. ही घसरण अशीच सुरू राहिली तर लवकरच चांदीचे दर निम्म्यावर येऊ शकतात. दिलासा मिळाला आहे.

मौल्यवान धातूच्या किमती कोसळण्यामागे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही कारणे आहेत. इराण-अमेरिका यांच्यात झालेल्या शांतता कराराने सोन्याला असलेली मागणी घटली आहे. कारण, गुंतवणूकदार संकटाच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. सोन्यात उच्चांकी दरावर नफावसुली झाल्यानेही किमतींवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वर्षभर सोने खरेदी थांबवण्याचे आवाहन आणि आयात शुल्कात दुप्पट वाढीचा थेट परिणाम मागणीवर झाला आहे. भारताच्या सोने आयातीत घट झाली आहे. औद्योगिक मागणीतील अनिश्चिततेमुळे चांदी आता स्वस्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles