58 वर्षे यशस्वी सेवा पूर्ण; आदर्श ग्रामसेवक रमेश गायके यांचा नेवासात गौरव सोहळा

58 वर्षे यशस्वी सेवा पूर्ण; आदर्श ग्रामसेवक रमेश गायके यांचा नेवासात गौरव सोहळा

नेवासा पंचायत समिती अंतर्गत उस्थळ दुमाला ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असले रमेश खंडेराव गायके यांनी नियत वयोमानानुसार 58 वर्षे यशस्वी सेवा पूर्ण केली. त्यांच्या सेवेचा गौरव सोहळा मित्रपरिवार व कुटुंबीयांच्या वतीने सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा येथे आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यास महंत उद्धव महाराज मंडलिक, ज्ञानेश्वर संस्थांचे अध्यक्ष म्हस्के महाराज, आमदार विठ्ठल रावजी लंघे पाटील, गटविकास अधिकारी लखवाल साहेब, माजी आमदार पांडुरंग अभंग, राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीव निकम, ग्रामसेवकांचे नेते व ढाकणे शैक्षणिक संकुलचे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांच्यासह इतर मान्यवर, ग्रामसेवक बंधू-भगिनी व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदर्श ग्रामसेवक म्हणून ओळख
रमेश गायके हे आदर्श ग्रामसेवक म्हणून सेवाकाळात यशस्वी कार्यासाठी ओळखले जातात. ते आदर्श पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्व असून वेतनवाडी पुरस्कार, संत गाडगेबाबा अभियान तसेच स्मार्ट ग्राम पंचायत राज अभियान यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. नेवासा तालुक्यात कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची भूमिका घेत ग्रामसेवकांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी संघर्षमय भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.

याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व संघटनेचे नेते एकनाथराव ढाकणे यांनी सांगितले की, रमेश गायके यांच्या कर्तव्यदक्षता आणि उत्तरदायित्वाच्या कामाची इतरांनी प्रेरणा घेऊन कामकाज करावे.

सत्काराला उत्तर देताना श्री. गायके यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा घेतला. ज्ञात-अज्ञात सर्व अधिकारी, पदाधिकारी व कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच मी यशस्वी कार्य करू शकलो, असे सांगून त्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश मोटे व गणेश डोंगरे यांनी केले. नंतर मान्यवरांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles