सोनं-चांदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळतेय. कालच १० तोळं सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. पण पुन्हा सराफा बाजार उघताच त्यामध्ये बदल झाले. आज २६ जून २०२६ रोजी शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळं किंमतीत २७० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच १० तोळ्याच्या किंमतीत २७०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज शनिवार २७ जून २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,३०० तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३२,२७५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,२२,८५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,२२९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.


