‘मी नवऱ्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते ‘ भर कार्यक्रमात तरुणीने प्रपोज करताच शाहरूख म्हणाला, व्हिडिओ

बॉलीवूडचा ‘किंग खान’ अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा चाहता वर्ग काही प्रेक्षकांना नवीन नाही.शाहरुखला एकदा पाहण्यासाठी फॅन्स अक्षरशः तासनतास त्याच्या घराबाहेर थांबलेली दिसतात. त्याची एखादी झलक पाहायला मिळावी यासाठी धडपडतात. गुरुवारी मंगळूरमधील एका कार्यक्रमात एका महिला चाहतीनं सगळ्यांसमोर ‘मी माझ्या पतीपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करते’ म्हणत भर कार्यक्रमात आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी या महिलेला शाहरूखने दिलेल्या मजेशीर उत्तराची सध्या एकच चर्चा आहे. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

मंगळूर मधील एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शाहरुख खानला त्याचा एका महिला चाहतीने सगळ्यांसमोर ओरडून प्रेमाची कबुली दिली. ‘मी तुझ्यावर माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम करते ‘ असं ते म्हणाली. त्यावेळी तिच्या आजूबाजूला असणारे सगळेच उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. या फॅनचं प्रेम पाहताच शाहरूख स्मितहास्य करत त्याच्या खास शैलीत म्हणाला ‘हे सगळं तुम्ही मला एकटाच सांगायला हवं होतं ‘ शाहरुखच्या या विनोदी उत्तरावर सगळेच हसले .तो पुढे म्हणाला ‘ मला माहित आहे की तुम्ही भावनेच्या भरात म्हणताय. मी तुमच्या भावना समजू शकतो.आणि मला खात्री आहे तुमचा नवऱ्याला ही ते समजते आहे.मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.तुमच्या नवऱ्यावरही प्रेम करतो.तुम्हा सगळ्यांचे कुटुंबावर प्रेम करतो.खूप खूप धन्यवाद ‘ असा शाहरुख म्हणाला. नंतर या चाहतीने शाहरुखला प्रश्नही विचारला. तिचा प्रश्न आहे असं कळल्यानंतर शाहरुख ही म्हणतो ‘आता प्रेमाची कबुली देऊन झाली आता प्रश्नही घेऊया.’

https://x.com/DonajCR7/status/2070272605865554347?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2070272605865554347%7Ctwgr%5E02128478c2d693e68d7bfa0dd550dd420d587121%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fentertainment%2Fshah-rukh-khan-fan-proposal-viral-video-i-love-you-more-than-my-husband-srk-funny-reply-goes-viral-1429551

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles