सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. आज सराफा बाजारा उघडात सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळला. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे सोनं खरेदीची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १३६० रुपयांची घसरण झाली आहे. तर २२ आणि १८ कॅरेटचं सोनं देखील स्वस्त झालं आहे. चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती ते जाणून घ्या…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १३६० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४५,२६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३६०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,५२,६०० रुपये खर्च करावे लागणार आहे.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १२५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३३,१५० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,३१,५०० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचं सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १३० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०८,९४० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०३०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,८९,४०० रुपये खर्च कारवे लागतील.
दरम्यान, सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी आज चांदीच्या दरात कोणताही मोठा बदल झाला आहे. आज १ ग्रॅम चांदी २४५ रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी २,४५,००० रुपयांना विकली जात आहे


