Gold-Price: ,सोन्याच्या दरात मोठी वाढ ;जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

इराण आणि अमेरिका युद्ध आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ, यामुळे जगभरातील शेअर बाजार धडाधड कोसळत आहे. याचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारातही पाहायला मिळाला. सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. आज २२ जुलै २०२६ रोजी, बुधवारी बुलियन्स मार्केटमध्ये सोने १५४० रुपयांनी महाग झाले, तर चांदीची किंमत २२९० रुपयांनी वधारली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित मालमत्ता म्हणून सोने-चांदीकडे वळताना दिसत आहे.

आज २२ जुलै रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ४५ हजार ०९० रुपये आहे, तर दागिन्यांसाठी वापरले जाणाऱ्या २२ कॅरेट सोने १ लाख ३२ हजार ९९९ रुपये आहे. चांदीचा दर २ लाख २६ हजार ५७० रुपये प्रती किलो आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडणावर शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती शहरानुसार बदलू शकतात. गेल्या एका आठवड्यात सोने जवळपास ३,००० रुपयांनी महाग झाले आहे, तर चांदीमध्ये तब्बल ५,४५० रुपयांनी वाढली आहे.

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ४५ हजार ०९० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३२ हजार ९९९ रुपये
चांदी प्रति किलोचा भाव – २ लाख २६ हजार ५७० रुपये

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles