Gold-Price:सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

आगामी सणासुदीच्या निमित्ताने भारतीय सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. याचा परिणामही थेट सोने-चांदीच्या किमतींवर होत आहे. गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याचा विचार केला तर सोन्यात मागील ८ दिवसांत जवळपास १०,००० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. चांदी आज १५२० रुपयांनी घसरली असली तरी आठवड्यात १५,००० रुपयांनी वधारली आहे. आज ११ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅम १,५३,८६० रुपयांची पातळी गाठली आहे, तर चांदीचा दर २,३६,३२० रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे जून महिन्यात भारतात होणारी सोन्याची आयात घटली आहे. इतकेच नाही तर देशातही सोन्याच्या मागणी मंदावलेली पाहायला मिळाली. मात्र, आठवड्याभरात सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे.

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५३ हजार ८६० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ४१ हजार ०३८ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ३६ हजार ३२० रुपये

शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५३,५३० १,४०,७३६
मुंबई १,५३,७९० १,४०,९७४
बेंगळुरू १,५३,९५० १,४१,१२१
कोलकाता १,५३,६३० १,४०,८२८
हैदराबाद १,५४,०७० १,४१,२३१

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles