देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज

देशात आताच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता ‘पोल ट्रॅकर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सर्वेक्षणाचे निकाल सांगणारा एक व्हिडीओ ट्विट करत भाजपला डिवचले आहे. आता खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी-शाह जाणार, ते नक्की जाणार, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘पोल ट्रॅकर’च्या सर्वेक्षणाचे विश्लेषण करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.पोल ट्रॅकरने ‘मूड ऑफ इंडिया’ या नावाने सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेची सॅम्पल साईझ 4 लाख 53 हजार इतकी आहे. या सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीए आघाडीला राम मंदिरातील घोटाळा आणि जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा मोठा फटका बसेल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे आतापर्यंत सलग 12 वर्षे सत्तेत असूनही भाजपला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसलेला नव्हता. मात्र, राम मंदिर आणि जंतर मंतरवरील आंदोलनामुळे मोदींचा करिष्मा फिका पडू शकतो, अशी शक्यता या सर्वेक्षणातून वर्तविण्यात आली आहे.

‘पोल ट्रॅकर’कडून लोकसभेच्या 543 मतदारसंघात 3 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात हा सर्व्हे करण्यात आला होता. या काळात अयोध्येच्या राम मंदिरातील घोटाळा आणि जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच तापलेला होता. त्यामुळे सर्वेक्षणाच्या निकालानुसार देशात लगेच लोकसभा निवडणूक झाली तर इंडिया आघाडीला 44 टक्के मतदान होईल, त्यांना 280 जागा मिळतील. तर भाजपप्रणित एनडीएला फक्त 40 टक्के मतं मिळतील आणि त्यांच्या एकूण जागांचा आकडा 240 पर्यंत खाली येईल. तर अन्य पक्षांना 16 टक्के मतं आणि लोकसभेच्या 23 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला
https://x.com/Murti_Nain/status/2087236353201193220?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2087377292595204236%7Ctwgr%5E206ec8b86c6ac8be1caeaf09f2042130f54fef03%7Ctwcon%5Es3_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fsanjay-raut-on-poll-tracker-survey-for-lok-sabha-election-bjp-nda-get-only-240-seats-congress-india-alliance-get-280-seats-marathi-news-1435208

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles