सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार सुरू आहे. आज श्रावणातील पहिल्या सोमवारी सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५३० रुपयांनी वाढ झाली. चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहे ते जाणून घ्या…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ५३० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला१,५५,६६० रुपये खर्च करावे लागतील. तर आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १५,५६,३०० रुपयांना विकले जात आहे.
आज २२ कॅरेट सोन्याचे दर देखील वाढले आहेत. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४२,७०० रुपये खर्च करावे लागतील. तर आज २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १४,२७,००० रुपये मोजावे लागतील.
तर आज २४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४१० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी १,१६,७६० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४१०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ११,६७,६०० रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. १ किलो चांदी २,५०,००० रुपयांना विकली जात आहे.


