गेले काही दिवस सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पाहायला मिळत होती. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना सणासुदीच्या काळात चांगलीच कात्री लागली असती. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्यांच्या किंमतीत मोठा बदल झालाय. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ९२० रुपयांनी घसरण झालेली आहे. तर चांदीच्या किंमतीतही ५०० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ९२० रुपयांनी घसरण झाली. २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ८५० तर १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६९० रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीत ही बदल झालेला आहे. आज प्रति ग्रॅम चांदीचा दर २४५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,४५,००० रुपये इतका आहे.
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५५ हजार ६१० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ४२ हजार ६४३ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ३७ हजार ०७० रुपये
प्रमुख शहरांतील आजचे २४ व २२ कॅरेटचे दर
शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५५,१७० १,४२,२३९
मुंबई १,५५,४३० १,४२,४७८
बंगळुरू १,५५,५६० १,४२,५९७
कोलकाता १,५५,२३० १,४२,२९४
हैदराबाद १,५५,६८० १,४२,७०७


