मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा एकदा उच्चांकाच्या दिशेने सरकला आहे. या दरवाढीमुळे खरेदीदारांच्या खिशावर काहीसा ताण वाढणार असला तरी बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जागतिक बाजारातील घडामोडी आणि मागणीत झालेल्या सुधारणेमुळे सोन्याच्या दरात आज वाढ दिसून येत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात थेट १,२०० रुपयांची तर २२ कॅरेट १० ग्रॅमच्या भावात १,१०० रुपयांची वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर
शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५२,२३० १,३९,५४४
मुंबई १,५२,४९० १,३९,७८३
बंगळुरू १,५२,६१० १,३९,८९३
कोलकाता १,५२,२९० १,३९,५९९
हैदराबाद १,५२,७३० १,४०,००३पुन्हा एकदा मजबूत स्थितीत आले आहे.


