सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. कालच्या एका दिवसात सोन्याचे दर ५०२० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे ५ हजारांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात खूप तेजीत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत. सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर १,५४,८०० रुपये झाले आहेत. सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सोनं खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठा प्रमाणात घट होईल. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५ हजार २० रुपयांनी वाढले आहेत. आज १ तोळा सोने १,५४,८०० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅममागे सोनं ४,०१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,२३,८४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे तर ५०,२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १५,४८,००० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर ४,६०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४१,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३,६८० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,१३,५२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४६,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १४,१९,००० रुपये झाले आहेत.१८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३,७७० रुपयांची वाढ झाली आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०१६ रुपयांनी वाढ झाली असून ९२,८८८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३७,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ११,६१,१०० रुपये झाले आहेत.


