खा.अॅड. उज्वल निकम यांची आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट
स्वर्गीय अरुण काका जगतापांच्या स्मृतींना उजाळा
अहिल्यानगर : राज्याचे सरकारी वकील तथा खासदार अॅड. उज्वल निकम यांनी आज आमदार संग्राम जगताप यांच्या भवानीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अॅड. निकम यांनी या प्रसंगी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या सामाजिक कार्याची आणि जनतेसाठीच्या अखंड लढ्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
तसेच अॅड. उज्वल निकम यांनी नुकत्याच दिवंगत झालेल्या स्वर्गीय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचा संदर्भ घेत, आमदार संग्राम जगताप यांच्याशी त्यांच्या दुःखात सहभागी होत शोकसंवाद साधला.


