नागरदेवळे गटाचे राजकारण तापले ; नागरदेवळे गटातून सुनिता पाखरे यांची राहणार उमेदवारी!

नागरदेवळे गटातून सुनिता पाखरे यांची राहणार उमेदवारी!
कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी; इच्छुक उमेदवारांमुळे नागरदेवळे गटाचे राजकारण तापले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे (ता. नगर) येथील ग्रामपंचायत सदस्य मयुर पाखरे यांनी नागरदेवळे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अलीकडेच पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत पाखरे यांच्या नावाची उमेदवारीसाठी एकमुखी मागणी कायकर्त्यांनी केली. या बैठकीत गावातील अनेक युवा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मयुर पाखरे यांनी नागरदेवळे जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी तयारी दर्शवली असून, त्या आपल्या मातोश्री सुनिता चंद्रकांत पाखरे यांना उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. गटातील प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्यासाठी व जनतेच्या सेवेसाठी आपल्या ताकदीने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामपंचायत सदस्य मयुर पाखरे यांनी नागरदेवळे गावात अनेक विकासात्मक कामे पार पाडली आहेत. विकासात्मक कामातून त्यांनी स्थानिकांमध्ये विशेष विश्‍वास निर्माण केला आहे.
मयुर पाखरे हे कै. आमदार शिवाजी कर्डीले यांचे विश्‍वासू कार्यकर्ते असून, सध्या पै. अक्षय कर्डीले यांचे खंदे समर्थक मानले जातात. कर्डीले परिवाराशी असलेल्या घट्ट नात्यामुळे आणि एकनिष्ठ कार्यशैलीमुळे त्यांचा प्रभाव केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण नागरदेवळे गटात वाढला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक कार्याचा वारसा असून, तरुण कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद, संघटनात्मक कौशल्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी नागरदेवळे गटात परिवर्तनासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे, असे मत मांडले. या पार्श्‍वभूमीवर सुनिता पाखरे यांचे नाव पुढे आले असून, त्यांनी या आव्हानासाठी तयारी दर्शवली आहे. गावातील व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे की, पाखरे यांनी ग्रामविकासाबरोबरच धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरदेवळे गटात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. सुनिता पाखरे यांच्या उमेदवारीमुळे नागरदेवळे गटातील निवडणुकीची रंगत वाढणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles