महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या निकालाबाबत निर्णय ; बोर्डाने पहिल्यांदाच केला बदल

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता बोर्डाने दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी बारावीच्या निकालाच्या नावावर अनेक फ्रॉड होताना दिसतात. आता या संपूर्ण प्रकाराला आळा बसणार आहे. बोर्डाने यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत.दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेकजण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. याच निकालाचा वापर करतात.परंतु आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे एकाच पानावर मिळणार आहे. त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे.

याशिवाय बोर्डाच्या निकालावर क्यूआर कोड देखील असणार आहे. तो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डाने हा बदल केला रआहे. यामुळे बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे.

दरम्यान, आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणत: एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन एक महिना उलटून गेला आहे. त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर दहावीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, अजून अधिकृत तारीख समोर आलेली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles