Ahilyanagar ….. सिस्पे घोटाळा उघड; 278 कोटींची मालमत्ता निष्पन्न, 12 जण अटकेत

राज्यात बहुचर्चित सिस्पे, इनफिनाईट बिकन व अन्य कंपन्यांच्या आर्थिक अपहराच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 12 जणांना गजाआड करत 278 कोटींची मालमत्ता निष्पन्न केली. त्यातील 115 कोटींची मालमत्तेचा एमपीआयडीतंर्गत प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. उर्वरित मालमत्तांचाही प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तपासात कंपनी, संचालक, एजंटांची सुमारे 2000 खाते गोठविण्यात आली आहेत.जादा परताव्याचे आमिष दाखवून सिस्पे, इनफिनाईट व अन्य तत्सम कंपन्यांमध्ये अहिल्यानगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, पुणे जिल्ह्यात गुंतवूणक करण्यास भाग पाडले. सिस्पे घोटाळ्याचे श्रीगोंदा, सुपा व तोफखाना पोलिस ठाण्यांत चार गुन्हे दाखल आहेत. या घोटाळ्यात गुंतवणूकदारांच्या जबाबानुसार साधारण 20 कोटींची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चार गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात चार संचालक व आठ एजंट अशा 12 जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी परदेशात फरार झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. तपासी अधिकाऱ्यांनी फरार आरोपींच्याही नाकेबंदी केली असून, लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत.

या गुन्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 115 कोटींची मालमत्ता पोलिसांनी निष्पन्न केली. 2 हजार बँक खाते गोठविण्यात आले असून त्या 113 कोटीची रक्कम आहे. 115 कोटींचा एमपीआयडीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. पुढील तपासात पुन्हा 155 कोटींची मालमत्ता निष्पन्न केली असून, त्याचा एमपीआयडीनुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाकडून कार्यवाही झाल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.दरम्यान एबीपी (ॲथोराईझ बिझनेस पाटर्नर) 6030 खातेधारकांनी ठेवीदारांच्या पैशातून गैरलाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची खाते गोठविण्यासाठी विविध बँकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.गुन्ह्यातील दोन मुख्य संशयित आरोपी दुबईत फरार झाले असून, त्यांनी तेथील नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे प्रयत्न हाणून पाडले. त्यांच्या अटकेसाठी कायदेशीर प्रक्रिया करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles