अहिल्यानगरमध्ये नशेच्या इंजेक्शनची अवैध विक्री, तरुणाला ‘एलसीबी’ने पकडले

शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्सन/बॉटल्या विकणा-या इसमावर छापा टाकुन 11,613/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.

अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी नशेचे इंजेक्शन/पदार्थ विकाणा-या इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहे.
सदर आदेशानुसार पो.नि. श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अवैधरित्या नशेचे इंजेक्शन/बॉटल्या विकणा-या इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/ अनंत सालगुडे, गणेश लबडे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, रोहित येमुल, अमोल आजबे, उत्तरेश्वर मोराळे, महिला पोलीस अंमदार वंदना मोढवे यांना सुचना देवुन रवाना केले.
सदर पथक अहिल्यानगर शहरात अवैधरित्या नशेचे बॉटल्या/इंजेक्शन विकणा-यांची माहिती घेत असतांना पथकास दिनांक 23/01/2026 रोजी रात्री 2/00 वा.चे सुमारास इसम नामे रोहित रघुनात बांगर रा.बागडपट्टी अहिल्यानगर हा परवानधारकास डॉक्टराचे चिठ्ठीशिवाय विकता न येणारे औषध व इंजेक्शन विक्री करण्याकरीता कुरिअरद्वारे मागविले असुन तो विक्री करण्यासाठी कब्जात बाळगुन सिध्देश्वर मंदिर बागडपट्टी अहिल्यानगर येथे थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री करता एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसुन आला. तेव्हा पथकाने त्यास ताब्यात घेवुन पोलीस पथक व पंचाची ओळख समजावुन सांगुन त्याचे नांव पत्ता विचारले असतांना त्याने त्याचे नांवे 1) रोहित रघुनाथ वंगार वय- 25 वर्षे रा. सिध्देश्वर मंदिराजवळ, बागडपट्टी, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याला झडतीचा उद्देश समजावुन सांगुन त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन एकुण 11,299/- रुपये किमतीचा नशेकरीता वापरल्या जाणा-या 37 बॉटल्या जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपी यांचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/164 गणेश शिवनाथ लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना स्टेशन गु. र. नं. 50/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,125,278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles