नगर शहरातील हॉटेलमधील घटना; दोन तरूणांवर हल्ला, मालकासह 10 ते 12 जणांवर गुन्हा

अहिल्यानगर-शहरातील टिळक रोडवरील हॉटेल नंदनवन येथे कोल्ड्रिंकच्या बाटलीवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना गुरूवारी (2 जुलै) पहाटे घडली. या घटनेत दोन तरूणांना लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह 10 ते 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय संजय शेलार (वय 29, रा. श्रीराम चौक, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. हॉटेल मालक हिरा जाधव, आदेश जाधव यांच्यासह 10 ते 12 अनोळखी वेटर विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अक्षय शेलार गुरूवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास मित्र ऋतुपर्ण राजेंद्र जाधव यांच्यासोबत नंदनवन येथे जेवणासाठी गेले होते.

जेवण झाल्यानंतर ऋतुपर्ण हात धुण्यासाठी गेले असताना अक्षय शेलार बिल भरण्यासाठी काऊंटरवर गेले. त्यावेळी टेबलवरील कोल्ड्रिंकची बाटली कुठे आहे, अशी विचारणा त्यांनी हॉटेलमधील वेटरकडे केली. वेटरने ती बाटली फेकून दिल्याचे सांगितले. त्याबाबत जाब विचारल्यानंतर काऊंटरवरील हिरा व आदेश जाधव यांनी उध्दटपणे उत्तर दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याच कारणावरून वाद वाढला.

हिरा व आदेश जाधव यंाच्यासह 10 ते 12 वेटर यांनी अक्षय शेलार याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना पार्किंग परिसरात ओढून नेण्यात आले. दरम्यान, मित्राला वाचविण्यासाठी धावून आलेल्या ऋतुपर्ण जाधव यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात ऋतुपर्ण गंभीर जखमी झाले आहेत. संशयितांनी खिशातील तीन मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चैन, हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles