बीडमध्ये खळबळजनक घटना ; मुलासमोरच बापाचा १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

सावत्र पित्याने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक आणि नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना केज शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

केज शहरात वास्तव्यास असलेल्या पीडित १३ वर्षीय मुलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने, दोन मुली झाल्यानंतर नऊ वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी तिने आरोपीसोबत दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा झाला. पीडित मुलगी ही आई आणि सावत्र पित्यासोबत राहत होती. ९ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता पीडितेची आई माहेरी गेली होती, तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. दुपारी १२:३० च्या सुमारास सावत्र पित्याने घरी येऊन, “आई कुठे गेली?” अशी विचारणा केली. मुलीने गावाला गेलेल्या आईला फोन करून “कधी येणार?” असे विचारले असता, आईने “येण्यास वेळ लागेल” असे सांगितले.

हीच संधी साधून सावत्र पित्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाला मोबाईल देऊन खाली बसवले आणि पीडित मुलीसोबत लज्जास्पद कृत्य करू लागला. मुलीने विरोध केला आणि “आईला सांगेन” असे म्हटले, तेव्हा “आईला सांगायचे नसते, आपल्यात भांडणे होतील” असे धमकावत नराधम पित्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. आई घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे पाहून तिने चौकशी केली. मुलगी घाबरलेली असल्याने सुरुवातीला काही बोलली नाही, मात्र आईने विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

१२ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावत्र पित्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १९८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ६४(३)(एफ), ६५(१) आणि पोक्सो कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles