महाराष्ट्रभर शोधून अभिषेक कळमकर सापडेना, आता झळकणार WANTED ची नोटीस
महिला अत्याचाराचे गुन्ह्यातील आरोपी अहिल्यानगरचा माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर याच्याविरूद्ध आता भारतीय न्यायसंहितेतील कलम ८४ प्रमाणे कार्यवाही करण्यास न्यायालयाने पोलिसांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आरोपी कळमकर याच्याविरूद्ध आता सार्वजनिक ठिकाणी WANTED ची नोटीस पोलिस लावू शकणार आहेत.
आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाने स्टँडिंग अटक वॉरंट काढले होते. पोलिसांनी त्याआधारे राज्यभर शोध घेतला. मात्र, आरोपी सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला फरार घोषित करून मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी न्यायालयात भारतीय न्यायसंहिता कलम ८४ प्रमाणे अर्ज करण्यात आला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने आरोपीला हजर होणेबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ८४ प्रमाणे जाहिरनामा काढुन तो सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागामध्ये प्रसिध्द करण्याचा आदेश दिला आहे. या जाहिरनाम्यामध्ये आरोपी अभिषेक बाळासाहेब कळमकर (रा. भुतकरवाडी चौक, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) याला तात्काळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. ३ यांच्यासमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार आरोपी हजर न राहिल्यास त्याला फरार आरोपी म्हणुन घोषीत करण्यात येईल. तरीही आरोपी हजर न झाल्यास त्याची संपत्ती जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – BNSS च्या कलम ८४ अंतर्गत जर एखादा आरोपी फरार असेल आणि कोर्टाने त्याला ‘घोषित गुन्हेगार’ (Proclaimed Offender) म्हणून जाहीर केले असेल, तर पोलिसांना त्या आरोपीचे फोटो, नाव आणि पत्ता असलेले फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे कायदेशीर अधिकार आहेत.
जेव्हा कोर्ट फरार आरोपीला हजर राहण्यासाठी जाहीरनामा (Proclamation) जारी करते, तेव्हा हा जाहीरनामा त्या व्यक्तीच्या घराच्या भिंतीवर, कोर्टाच्या इमारतीवर आणि
या फलकावर आरोपीचे छायाचित्र (फोटो), गुन्ह्याचा तपशील आणि हजर राहण्याची तारीख नमूद केलेली असते.
माजी महापौर अभिषेक कळमकर आता फरार आरोपी म्हणुन घोषीत
- Advertisement -


