जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच

राज्याच्या राजकारणाने मोठी कूस बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील हे राज्याचे नवीन अर्थमंत्री असतील, असे संकेत मिळत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील राजकारणात अंडरकरंट दिसत होते. जयंतराव पाटील आणि विनोद तावडे यांची भेट, त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट, जयंतवरावांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या वर्षावरील भेटीगाठी आणि अखेरीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, हा घटनाक्रमच नवीन राजकीय समीकरण स्पष्ट करत होता. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जयंतराव पाटील यांचा अर्थमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

सुषमा अंधारे यांना जयंत पाटील यांना अर्थखातं मिळणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अंधारे यांनी सांगितले की, ‘पक्ष कुठलाही असो, अजितदादांनी अर्थखातं उत्तम संभाळलं होतं. अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडे आहे. मात्र जयंत पाटील आमच्यासोबत आहेत. सुनील तटकरे, प्रफु्ल्ल पटेलांची विश्वासार्ता काय?दादा गेल्यावर बोलत होते विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही. आता बोलतात विलिनीकरणाबाबत चर्चा झाली, कोणते तटकरे खरे? तटकरे मुलांना मोठे करण्यात लागले होते, अनिकेत तटकरे, अदिती तटकरेंचा पोर्टफोलिओ काय? केवळ सुनील तटकरेंची मुलं, कर्तुत्व काय. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, भाजपच्या नेत्याला नव्हे. भेटीचं कारण जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

सनील तटकरेंच्या भूमिकेवर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, ‘सुनील तटकरेंना वाटलं सगळा पक्ष हातात घेता येईल, मात्र त्यांना ते जमलां नाही. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया समजण्याचा प्रयत्न तटकरेंनी केला, मी सहज लपेटू शकतो असं त्यांना वाटलं, पण तसं झालं नाही. मात्र घी सिधे उंगली से निकलत नव्हता म्हणून उंगली तेढी केली.’

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles