राजकीय हालचालींना वेग ;खासदार पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. पार्थ पवार यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांना मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून लॉबिंग सरू करण्यात आली आहे.राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहेर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून खासदार पार्थ पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. हे पत्र १३ जुलै २०२६ रोजीचे आहे. यात पार्थ पवार यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलीय. त्यांच्या विविध गुणांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशभरातील विस्तारावर प्रकाश टाकण्यात आलाय.पार्थ पवार हे युवा नेतृत्वाचा चेहरा आहेत आणि त्यांना केंद्रात संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देशभर विस्तार होण्यास मदत होईल. तसेच पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी विनंतीही या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय, असा दावा उदयकुमार निंबाजी आहेर यांनी लिहिलेल्या पत्रात केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांच्या पत्रात पार्थ पवार यांच्या बाजूने अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. पार्थ पवार यांची तरुण प्रतिमा, हिंदी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, लंडनमधील उच्च शिक्षण, राष्ट्रीय स्तरावर पक्ष बळकट करण्याची आणि तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles