लोहगडावरचा केतनला ढकलण्यात आलं तो भाग पोलिसांनी केला बंद,पोलिसांनी सांगितले कारण

पुणे जिल्ह्यात असलेला लोहगड हा किल्ला मागच्या दोन आठवड्यांपासून चर्चेत आला आहे. कारण १८ जूनला याच लोहगड किल्ल्यावरुन सिया गोयलने केतन अग्रवालला धक्का दिला आणि त्याची हत्या केली असा आऱोप तिच्यावर आहे. तसंच या हत्येसाठी सियाला तिचा प्रियकर चेतन चौधरीने त्याला साथ दिली असा आरोप आहे. या दोघांना २३ जून रोजी अटक करण्यात आली. या दोघांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता लोहगडावरचा सिया गोयलने ज्या ठिकाणाहून केतनला ढकलल्याचा आरोप आहे तो भाग पोलिसांनी बंद केला आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने लोहगडावरचा केतन अग्रवालला जिथून ढकलण्यात आलं तो भाग पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंद केला आहे. ANI या वृत्तसंस्थेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

१८ जून पूर्वी केतन आणि सिया हे दोघंही त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. या वर्षाच्या अखेरीस त्यांचा विवाह होणार होता. राजस्थानातील उदयपूर या ठिकाणी पॅलेसही बुक करण्यात येणार होता. या दोघांचाही फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. पण सियाला चेतन चौधरी आवडत होता. त्यामुळे चेतनसह मिळून तिने केतनच्या हत्येचा कट आखला असा आरोप या दोघांवर आहे. १८ जूनला सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. तिथून तिने त्याला ढकललं आणि यावेळी तिला चेतन चौधरीनेही मदत केली असा आरोप सिया आणि चेतनवर आहे. केतनला ढकलल्यानंतर सियाने तिच्या घरी आणि केतनच्या घरी केतन पाय घसरुन दरीत कोसळला असं सांगितलं. पोलिसांनाही तिने हेच सांगितलं होतं. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू आहे असं वाटलं होतं. प्राथमिक तपासात पोलिसांनीही केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू अशी नोंद केली होती. मात्र नंतर हा अपघाती मृत्यू नसून हत्या आहे हे समोर आलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles