Friday, March 6, 2026

५ लाखांचं कर्ज अन् फक्त ४ टक्के व्याजदर; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. शेतकऱ्यांना अशीच एक योजना राबवली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्डमध्ये शेतकऱ्यांना खूप कमी व्याजदरात कर्ज मिळतात. शेतीसाठी आणि शेतीसंबंधित कामांसाठी लगेच कर्ज देणे हा यामागचा उद्देश आहे.

या योजनेत शेतकरी कापणीनंतरचा खर्च, घरगुती गरजा, पशुपालन आणि शेतीच्या कामांसाठी कर्ज घेऊ शकतात.या योजनेत सरकार २ टक्के अनुदान देते. वेळे पैसे भरण्यासाठी ३ टक्के बोनस देते. जेणेकरुन शेतकऱ्यांना फक्त ४ टक्के व्याजदरावर कर्ज मिळते.

किसान क्रेडिट कार्डवरील हे कर्ज सर्वात स्वस्त कृषी कर्जापैकी एक आहे. किसान क्रेडिट कार्ड नक्की आहे तरी काय जाणून घ्या

किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी राबवलेली योजना आहे. या योजनेत शेती आणि इतर गरजांसाठी कर्ज दिले जाते. याद्वारे तुम्ही शेतीची बियाणे, खते आणि उपकरणे खरेदी करु शकतात. हे व्याजदर खूप कमी असते त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. हे कार्ड डेबिट कार्डसारखे काम करते. या कार्डद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकतात.

या योजनेत कर्ज किती द्यायचे हे वित्तपुरवठ्याचे प्रमाण, जमीन, लागवड खर्च आणि शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांवर अवलंबून असते. यंदाच्या बजेट निर्मला सितारामन यांनी कर्जाची कमाल मर्यादा वाढवून ३ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत केली आहे. हे २ लाखांचे कर्ज तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार आहे.

किसाम क्रेडिट कार्ड हे डिजिटल डेबिट कार्ड आहे. यामधून तुम्ही एटीएम, मोबाईल अॅप, बियाणे- खत विक्रेत्याच्या पीओएस मशीनमधून पैसे काढू शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles