अहिल्यानगर – जिल्हा परिषदेच्या 75 गट आणि पंचायत समितीच्या 150 गणांच्या निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचना ही 2017 नूसार असून यात कर्जत आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढलेले दिसत आहे. या शिवाय 2017 च्या गट आणि गण यादीत फारसा बदल झालेला दिसत नाही. काही तालुक्यात गट आणि गणातील गावे बाजू-बाजूला सरकली असतील, मात्र त्या बाबतच तपाशील येत्या दोन दिवसांत समोर येणार आहे.दरम्यान, 2017 नूसार 2025 च्या गट आणि गणांची प्रभाग रचना दिसत असली तरी 2017 नूसार गट आणि गणांची राजकीय आरक्षण राहणार असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. काही राजकीय तज्ज्ञाच्या मते जिल्ह्यातील 2017 राजकीय आरक्षण 2025 मध्ये बदलण्याची शक्यता आहे. शिवाय कर्जत आणि जामखेड तालुक्यात वाढलेल्या जिल्हा परिषद दोन गटांमुळे राजकीय आरक्षणाला खो बसून जिल्ह्यातील झेडपी गटाचे आरक्षण बदण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून येणार्या सुचना नूसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जाहीर झालेल्या प्रारूप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर 21 तारखेपर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर 28 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार असून या हरकतींवर 11 ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत.
तसेच 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकार्याकडे सादर करण्यात येणार आहेत. म्हणजे 18 ऑगस्टला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुक कामाला लागले असून प्रभाग रचनेबाबत अडचणी असल्यास जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे हरकती घेता येणार आहे. यासाठी सात दिवसांचा कालावधी राहणार आहे.
अकोले- समशेरपुर : पाचपट्टावाडी, तिरडे, पेढेवाडी, म्हाळुंगी, पाडोशी, सांगवी, केळी रुम्हणवाडी, टहाकरी, घोडसरवाडी, समशेरपुर, मुथाळणे, कोकणवाडी, चंदगिरवाडी, एकदरे, पिंपळदरावाडी, जायनावाडी, शेणीत बु, खिरविरे, कोंभाळणे, लाडगाव, देवगाव, बाभुळवंडी, आंबेवंगण, मान्हेरे, टिटवी, शेलविहीरे, पिंपरकणे. देवठाणः सावरगाव पाट, देवठाण, गर्दणी, खानापूर, टाकळी, ढोकरी, बहिरवाडी, मेंहेंदुरी, विरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी, तांभोळ, रेडे, सुगाव खुर्द, कुंभेफळ. धामणगाव आवारी : कळस खुर्द, कळस बु, मनोहरपुर, सुगाव बु, परखतपुर, वाशेरे, नवलेवाडी, धुमाळवाडी, औरंगपुर, उंचखडक बु, उंचखडक खुर्द, पिंगळगाव नाकविंदा, शेरणखेल, म्हाळादेवी, निळवंडे, निंब्रळ, रुंभोडी, इंदुरी, विठे, अंबड, धामणगाव आवारी. राजूर : रणद बु, कोदणी, माळेगाव, कोहंडी, दिंगबर, चितळवेढे, जामगाव, राजुर, केळुंगण, कातळापुर, तेरूंगण, गुहीरे, वारंघुशी, जहागीरदारवाडी, बारी, पेंडशेत, चिचोंडी, वाकी, शेंडी, मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, शिंगणवाडी, साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल, भंडारदरा. सातेवाडी : कुमशेत, अंगीत, शिरपुंजे बु, धामणवन, सावरकुटे, मवेशी, गोंदोंशी, कौठवाडी, साकिरवाडी, चिंचावणे, वांजुळशेत, खडकी बु, शिसवद, पाचनई, लव्हाळी ओतूर, पाडाळणे, शेलद, पैठण, घोटी, तळे, कोहणे, शिळवंडी, सोमलवाडी, आंभोळ, आंबित खिंड, पळसुंदे, सातेवाडी, केळी कोतूळ, केळी ओतूर. कोतूळ : कोतूळ, धामणगाव पाट, मोग्रस, पांगरी, पिंपळगाव खांड, लिंगदेव, लहित बु, चास, बोरी, वाघापुर, लहित खुर्द, भोळेवाडी, नाचणठाण, मन्याळे, कळंब, पिंपळदरी, करंडी, खुंटेवाडी, ब्राम्हणवाडा, जांभळे, चैतन्यपुर, बेलापुर, बदगी, जाचकवाडी.
संगमनेर- समनापुर : निमोण, कर्हे, सोनवाडी, पळसखेड, सोनोशी, पिंपळे, पारेगाव बु, पारेगाव खुर्द, समनापूर, कुरण, सुकेवाडी, खांजापूर, मालदाड, सायखिंडी, निंभाळे, नान्नज दुमाला, काकडवाडी. तळेगाव : तळेगाव, चिंचाली गुरव, देवकौठे, तिगाव, करुले, वडझरी बुद्रूक, वडझरी खूर्द, कासारे, पोखरी हवेली, लोहारे, मिरपूर, वडगाव पान, माळेगाव हवेली, निळवंडे, कौठे कमळेश्वर, मेंढवण, कोकणगाव. आश्वी बुद्रूक : आश्वी बुद्रूक, प्रतापपुर, चिंचपुर बुद्रूक, सादतपुर, औरंगपुर, निमगाव जाळी, आश्वी खुर्द, शिबलापुर, पिंप्री लौकी अजमपुर, खळी, झरेकाठी, चणेगाव, दाढ खुर्द, कोंची, शेडगाव. जोर्वे : जोर्वे, कोल्हेवाडी, रहिमपुर, उंबरी, ओझर खुर्द, अंभोरे, मालुंजे, डिग्रस, पिंपरणे, ओझर बुद्रूक, कनकापुर, कनोली, पानोडी, मनोली, हंगेवाडी, रायते, वाघापुर, कोळवाडे. घुलेवाडी : घुलेवाडी, गुंजाळवाडी, ढोलवाडी (एन.व्ही.), कासारदुमाला, वेल्हाळे. धांदरफळ बुद्रूक : धांदरफळ बुद्रूक, राजापुर, जवळे कडलग, निमगाव भोजापुर, चिकणी, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा, सांगवी, कौठे धांदरफळ, धांदरफळ खु., चिखली, मंगळापुर, निमगाव बुद्रूक, निमगाव खुर्द. चंदनापुरी : संगमनेर खुर्द, रायतेवाडी, जाखुरी, हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, शिरापुर, चंदनापुरी, सावरगाव तळ, झोळे, खांडगाव, नांदुरी दुमाला, पेमगिरी, सावरचोळ, शिरसगाव, निमज, मिर्झापुर, खराडी, देवगाव. बोटा : आंबी खालसा, कौठे खुर्द, सावरगाव घुले, माळेगाव पठार, सारोळे पठार, महालवाडी, जवळे बाळेश्वर, वरुडी पठार, पोखरी बाळेश्वर, पिंपळगाव माथा, कौठे बुद्रूक, खंदरमाळवाडी, बोटा, आंबी दुमाला, म्हसवडी, कुरकुटवाडी, अकलापुर, कुरकुंडी, भोजदरी, वनकुटे, घारगाव, बोरबनवाडी. साकूर : पिंपळगाव देपा, कौठे मलकापुर, दरेवाडी, रणखांबवाडी, माडवे बुद्रूक, शिंदोडी, वरवंडी, खरशिंदे, खांबे, कर्जुले पठार, डोळासणे, साकूर, हिवरगाव पठार, जांबूत बुद्रूक, नांदूर खंदरमाळ, जांभुळवाडी, बिरेवाडी, शेंडेवाडी. कोपरगाव- सुरेगाव : सुरेगाव, वेळापुर, हंडेवाडी, मायगाव देवी, कारवाडी, मंजूर, धामोरी, रवंदे, चासनळी, वडगाव, बक्तरपुर, सांगवी भुसार, मोर्वीस, मळेगाव थडी, सोनारी. ब्राम्हणगाव : ब्राम्हणगाव, खिर्डी गणेश, धारणगाव, येसगाव, टाकळी, नाटेगाव, दहेगाव बोलका, पढेगाव, शिरसगाव, तिळवणी, आपेगाव, ओगदी, आंचलगाव, बोलकी, गोधेगाव, करंजी बु., कासली. संवत्सर : वारी, धोत्रे, भोजडे, लौकी, खोपडी, कान्हेगाव, तळेगाव मळेे, घोयेगाव, उक्कडगाव, संवत्सर, सडे, कोकमठाण. शिंगणापुर : शिंगणापुर, मुर्शतपुर, डाउच बु., चांदगव्हाण, जेउर पाटोदा, डाउच खुर्द, घारी, कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, मढी बु, हिंगणी, कोळगाव थडी, कुंभारी, शहाजापूर. पोहेगाव बु. : चांदेकसारे, शहापूर. मढी खुर्द, देर्डे चांदवड, देर्डे कोर्हाळे, जेऊर कुंभारी, सोनेवाडी, वेस, पोहेगाव बु., मनेगाव, रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, अंजनापूर, जवळके, बहादरपूर, बहादाराबाद, काकडी. राहाता-पुणतांबा : सावळीविहीर बु., सावळविहीर खुर्द, रुई, शिंगवे, पिंपळवाडी, पुणतांबा, न.पा.वाडी, एकरूपे, रामपूरवाडी, रांजणगाव खु. वाकडी : वाकडी, चितळी, जळगाव, धनगरवाडी, लोहगाव, बाभळेश्वर बु, राजुरी, रांतणखोल. साकुरी : अस्तगाव, पिंपळस, खडकेवाके, दहिगाव कोर्हाळे, कोर्हाळे, वाळकी, डोर्हाळे, कनकुरी, साकुरी, नांदुर्खी बु, नांदुर्खी खुर्द, निमगाव कोर्हाळे, निघोज. लोणी खु. : लोणी बु., पिंपरी निर्मळ, आडगाव बु, आडगाव खुर्द, पिंपरी लोकाई, केलवड बु, लोणी खुर्द, गोगलगाव. कोल्हार बु. : दाढ बु, हणमंतगाव, हसणापूर, चंद्रापूर, दुर्गापूर, पाथरे बु., तिसगाव, कोल्हार बु.,भगवतीपूर, ममदापूर. श्रीरामपूर- उंदिरगाव : निमंगाव खैरी, महांकाळवडगाव, माळेवाडी, मातुलठाण, रामपूर, जाफराबाद, सराला, नाऊर, नायगाव, गोंडेगाव, गोवर्धणपूर, उंदिरगाव, माळवडगाव, हरेगाव, मुठेवडगाव, घुमनदेव, भामाठाण, खानापूर, कमलपूर. टाकळीभान : टाकळीभान, कारेगाव, खोकर, भोकर, निपाणीवडगाव, वडाळामहादेव, मातापूर. दत्तनगर : दत्तानगर, शिरसगाव, दिघी, ब्राम्हणगाव वेताळ, भैरवनाथनगर, उक्कलगाव, मांडवे, एकलहरे, फत्याबाद, कुरणपूर, खंडाळा, गळनिंब, कडीत खुर्द. बेलापूर : बेलापूर बु., बेलापूर खुर्द, बळदगाव, पढेगाव, मालुंजा बु., खिर्डी, लाडगाव, भेर्डापूर, कान्हेगाव, उबंरगाव, वांगी बु., वांगी खुर्द, गुजरवाडी. नेवासा -बेलपिंपळगाव : बेलपिंपळगाव, घोगरगाव, जैनपूर, बैलपांढरी, सुरेगाव गंगापूर, गोधेगाव, उस्थळ खालसा, भालगाव, बकुपिंपळगाव, मुरमे, बहिरवाडी, सलाबतपूर, जळके खुर्द, जळके बु., गळनिंब, गिडेगाव, टोका, गोगलगाव, मंगळापूर, खेडलेकाजळे, प्रवरासंगम. कुकाणा : कुकाणा, अंतरवली, कडुले, चिलेखनवाडी, जेऊर, तरवडी, नांदुरशिकारी, सुलतानपूर, सुकळी बु., शिरसगाव, गोपाळपूर, खामगाव, रामडोह, वाकडी, प्रिप्री शहाली, गेवराई, पाथरवाले, वरखेड. भेंडा बु. : भेंडा बु., भेंडा खु. सौंदाळ, देवगाव, नजिक चिंचोली, शहापूर, दिघी, मुकिंदपूर, बांभुळखेड, नागपूर, मक्तापूर, पिचडगाव, गोंडेगाव, खुणेगाव, रांजणगाव, कारेगाव, खडका. भानसहिवरे : भानसहिवरे, माळीचिंचोरा, उस्थळदुमाला, नविन चांदगाव, नारायणवाडी, हंडीनिमगाव, सुरेशनगर, निपाणी निमगाव, पाचेगाव, पुणतगाव, नेवासा बु., गोमाळवाडी, चिंचबन, खुपटी, लेकुरवाळी आखाडा, जायगुडे आखाडा, गोणेगाव, निंभारी. खरवंडी : खरवंडी, हिंगोणी, कांगोणी, वडाळा बहिरोबा, बर्हाणपूर, रस्तापूर, म्हाळसापिंपळगाव, करजगाव, गणेशवाडी, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी, पानेगाव, तामसवाडी, शिरेगाव, अंमळनेर, खेडलेपरमानंद, वाटापूर. सोनई : सोनई, शिंगणापूर, घोडेगाव, झापवाडी, मोरेचिंचोरे, लोहगाव, पानसवाडी, धनगरवाडी, वंजारवाडी. चांदा : चांदा, लोहारवाडी, राजेगाव, शिंगवेतुकाई, फत्तेपूर, वांजोळी, कौठा, मांडेगव्हाण, देडगाव, तेलकुलगाव, पांचुदा, माका, महालक्ष्मी हिवरे, देवसडे. शेवगाव- दहिगाव ने : दहिगाव ने, विजयपुर, रांजणी, सुलतानपूर बु., मजलेशहर, शहरटाकळी, ढोरसडे, भाविनिमगाव, घोटण, एरंडगाव समसुद, एरंडगाव भागवत, लाखेगाव, बोडखे, ताजनपूर, दादेगाव, खुंटेफळ, दहिफळ जुने, दहिफळ नवीन, तळणी, खानापूर, कन्हेटाकळी, न. बाभुळगाव, कुरुडगाव. बोधेगाव : मुंगी, गदेवाडी, दहिगाव-शे, खडके, मडके, राक्षी, चापडगाव, प्रभुवडगाव, लक्षमापूरी, खामपिंप्री जुनी, खामपिंप्री नवीन, पिंगेवाडी, सोनविहीर, बोधेगाव, कांबी, बालमटाकळी, गा. जळगाव, सुकळी, हातगाव. भातकुडगाव : भातकुडगाव, देवटाकळ, हिंगणगाव ने, खामगाव, बक्तरपूर, जोहरापूर, भायगाव, लोळेगाव, सामनगाव, आखातवाडे, निंबे, ढोरजळगाव ने, वडूले बु., अमरापूर, वडूले खुर्द, बर्हाणपूर, आव्हाणे बु., आव्हाणे खूर्द, सुलतानपूर खुर्द, भगुर, वाघोली, वरूर बु., ढोरजळगाव शे, मळेगाव. लाडजळगाव : खरडगाव, सालवडगाव, माळेगाव ने, आखेगाव, वाडगाव, ठा. निमगाव, सोनेसांगवी, वरखेड, हसनापूर, कोळगाव, थाटे, मंगरूळ खुर्द, मंगरूळ बु., अंतरवाली बु., बेलगाव, लाडजळगाव, अंतरवाली खु.शे, शिंगोरी, अधोडी, दिवडे, शेकटे बु., चेडेचांदगाव, राणेगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, कोनाशी, नागलवाडी, ठा. पिंपळगाव. पाथर्डी : कासार पिंपळगाव कासारपिंपळगाव, पाडळी, डांगेवाडी, चितळे, सुसरे, सोमठाणे नलावडे, साकेगाव, सांगवी बु., खेर्डे, ढवळेवाडी, कोरडगाव, औरंगपूर, पागोरी पिंपळगाव, जिरेवाडी, निपाणी जळगाव, सोनोशी, तोंडोळी. भालगाव : भालगाव, खरवंडी कासार, मुंगूसवाडे, मालेवाडी, एकनाथवाडी, मिडसांगवी, जवळवाडी, ढाकणवाडी, भारजवाडी, अकोला, शेकटे, मोहोजदेवढे, भुतेटाकळी, नांदुर निंबादैत्य, कारेगाव, येळी, पिंपळगव्हाण, जांभळी. तिसगाव : माळीबाभूळगाव, हत्राळ, सैदापूर, मढी, घाटशिरस, शिरापूर, निवडूंगे, रांजणी, धामणगाव, केळवंडी, तिसगाव, सोमठाण सुर्द, मोहोज बु., मोहोज खुर्द, कडगाव, राघोहिवरे, खांडगाव, कौडगाव आठरे, मांडवे, देवराई, पारेवाडी, मिरी : मिरी, रेणुकावाडी, शंकरवाडी, आडगाव, जवखेडे दुमाला, जवखेडे खालसा, हनुमान टाकळी, कामत शिंगवे, कोपरे, शिंगवे केशव, करंजी, डोंगरवाडी, डमाळवाडी, लोहसर, शिराळ, चिचोंडी, गितेवाडी, दगडवाडी, धारवाडी, वैजूबाभूळगाव, भोसे, कोल्हार, सातवड. टाकळीमानूर : माणिकदौंडी, पत्र्याचा तांडा, मोहरी, घुमटवाडी, लांडकवाडी, पिरेवाडी, शिरसाठवाडी, चितळवाडी, आल्हणवाडी, जाटदेवळे, बोरसेवाडी, धनगरवाडी, मोहटे, टाकळीमानूर, चुंभळी, अंबिकानगर, चिंचपुर पांगूळ, चिंचपुर इजदे, भिलवडे, पिंपळगाव टप्पा, तिनखडी, जोगेवाडी, वडगाव, करोडी. नगर-नवनागपुर : देहरे, नांदगाव, शिंगवे, विळद, कर्जुने खारे, इसळक, निमगाव घाणा, पिंप्री घमुट, नवनागापुर, वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी, मांजरसुबा. जेऊर : जेउर, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपुर, बहिरवाडी, ससेवाडी, मजले चिंचोली, खोसपुरी,पांगरमल, उदरमल, आव्हाडवाडी, बुर्हाणनगर, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उजैणी, वारुळवाडी, कापुरवाडी, देवगाव, रतडगाव. नागरदेवळे : नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी, शहापुर केकती, मेहेकरी, बारदरी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी, खांडके, रांजणी, माथणी, भातोडी पारगाव, पारगाव भातोडी, पारेवाडी, कौडगाव, कोल्हेवाडी, सारोळा बद्दी, आगडगाव. दरेवाडी : दरेवाडी, बुरुडगाव, वाकोडी, अरणगाव, खंडाळा, चिचोंडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, उक्कडगाव, नारायणडोह, निंबोडी, वाळूंज, टाकळी काझी, मदडगाव, दशमीगव्हाण. निंबळक : निंबळक, हमीदपुर, नेप्ती,जखणगाव, हिंगणगाव, खातगाव टाकळी, टाकळीखातगाव, हिवरेबाजार, पिंपळगाव वाघा, चास, भोयरे खु., भोयरे पठार, पिंपळगावकौडा, कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर, सोनेवाडी, (चास), निमगाव वाघा. वाळकी : वाळकी, बाबुर्डी घमुट, खडकी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, घोसपुरी, हिवरेझरे, देउळगाव सिध्दी, तांदळीवडगाव, गुंडेगाव, राळेगण, वडगाव तांदळी, दहिगाव, पारगाव मैला, शिराढोण, साकत खुर्द, वाटेफळ, रुईछत्तीसी, गुणवडी, आंबिलवाडी, मठापिप्री, हातवळण. राहुरी- टाकळीमिया : कोल्हार खुर्द, चिंचोली, गंगापूर, पिंपळगाव, दवणगाव, संक्रारपूर, आंबी, अमळनेर, केसापूर, चांदेगाव, करजगाव, ब्राम्हणगाव भांड, बोधेगाव, टाकळीमिया, मुसळवाडी, लाख, जातप, त्रिंबकपूर, मालेगाव, मालुंजी, महालगाव, वाघाचा आखाडा. राहुरी : मानोरी, आरडगाव, वळण, मांजरी, वांजुळपोई, तिळापुर, कोपरे, पाथरे खुर्द, खुडसर गाव, ब्राह्मणी, केंदळ बु., केंदळ खू., पिंपरी वळण, चंडकापूर, कोंढवड, शिलेगाव, तांदुळवाडी, ब्राह्मणी : देसवंडी, तमन्ना आखाडा, गुहा, चिंचविहिरे, गणेगाव, कणगर बु., वडनेर, वर शिंदे, ताराबाद. गुहा : खडकवाडी, तांभेरे, सात्रळ, माळेवाडी, सोनगाव, धानोरे, निंभोरे, तुळापूर, तांदूळने, कानडगाव, रामपूर, बारागाव नांदूर, बारागाव नांदूर, कुरणवाडी, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, चिंचाळे, गडदे आखाडा, औथर, जांभळी, दरडगाव थडी, महेशगाव, चिकलठाण, कोळेवाडी, दिग्रस, राहुरी खुर्द, रवंडी, पिंपरी अवघड, सडे. वांबोरी : उंबरे, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, बाबुळगाव, खडांबे बुद्रुक, खडांबे बुद्रुक, कुक्कडवेढे, केडगाव, मोकळवळ, वांबोरी, कात्रड, गुंजाळे. पारनेर- कर्जुले हर्या, पिंपळगाव रोठा, टाकळी ढोकेश्वर, नांदूर पठार, सावरगाव, पोखरी, कातळवेढा, पळसपुर, म्हसोबा झाप, वारणवाडी, कारेगाव, गारगुंडी, कासारे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव, ताळा, वासुंदे, ढोकी, दिसवडे, खडकवाडी, मांडवे, खूप, बोंद्रे, कोकणेवाडी, तीखोल, पळशी, वनकुटे, धोत्रे बु., ढवळपुरी, भाळवणी, माळकूप, पाडळी, कानूर, वडगाव, आमली, भांडगाव, जामगाव, शहांजपूर, सारोळा, अडवळी, दैठणे गुंजाळ, लोणी हवेली, गोरेगाव, डिकसळ, कानूर पठार, दरोडी, जवळा, पिंपरी पठार, विरोली, हत्तलखिंडी, पुणेवाडी, पिंपळगाव, वेलदरे, वडगाव दर्या, पाडळी दर्या, आकलनवाडी, करंदी, किनी, वडझिरे, जाधववाडी, बाभुळवाडी, जवळा, सांगवी सूर्या, गांजी भोयरे, देवी भोईरे, चिंचोली, पिंपरी जलसेन, वडूले, सिद्धेश्वर वाडी, पिंपळनेर पानोली, निघोज, आळकुटी, वडनेर, चुंबुत, रेनवडी, शिरापूर, शेरी, कासारे, कळस, पाडळी, आळे, रांधे, पाबळ, लोणी मावळा, मस्केवाडी, गारखेंड, निघोज, पठारवाडी, गुणुरे, कोहेकडी, मसे खुर्द, राळेगण थेरपाळ. सुपा : राळेगणसिद्धी, वाडेगव्हाण, कुरुंद, यादव वाडी, नारायणगव्हाण, पाडळी, रांजणगाव, पळवे बु, कडूस, पळवे, कुप, मावळेवाडी, सातेगाव, म्हसणे, वडनेर हवेली, गटेवाडी, घाणेगाव, वाघुंडे खुर्द, व बुदुक सुपा, हंगा, मुळशी, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी, गवळी, रांजणगाव मशीद, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा. जामखेड-जवळा : चोंडी, मतेवाडी, जवळा, डोणगाव, अरणगाव, पाटोदा, फकराबाद, धानोरा, चोबेवाडी, मुंजेवाडी, बारले, रत्नापुर, कुसडगाव, खांडवी. खर्डा : खर्डा, लोणी, आपटी, वाकी, बाळगव्हाण, सातेफळ, जातेगाव, पिंपळगाव, तरडगाव, सोनेगाव, जवळके, धनेगाव, दिघोळ, मोहरी, नान्नज, पाटेवाडी, गुरेवाडी वाघा, राजेवाडी. साकत- साकत, मोहा, देवदैठण, सावरगाव, नाहुली, नायगाव, राजुरी, सारोळा, पाडळी खुरदैठण, धोंड पारगाव, झिक्री, पिंपळगाव आवळा, घोडेगाव, बंदखडक, धामणगाव तेलंगशी जायभाय वाडी आनंदवाडी. कर्जत-मिरजगाव : निमगाव गांगर्डा, घुमरी, बेलगाव, तिखी, नागमठाण, मांदळी, चिंचोली, रमजान, थेरगाव, रवळगाव, कोंबडी, खांडवी, मिरजगाव, कोकणगाव, चांदी बुद्रुक, चांदी बुद्रुक, गुरव पिंपरी, कौंडाने, मुळेवाडी, रांजनवाडी, नागलवाडी, नागापूर, बाबुळगाव, खालसा निंबोडी, तरडगाव मलठाण, टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळजात, डिकसळ सुपे, नवसरवाडी. चापडगाव- पाटेवाडी, जळगाव, निमगाव डाकू, चापडगाव, दिघी पाटेवाडी, खंडाळा, शितमपूर, भैरोबावाडी, कापरेवाडी, वालवड, रेहकुरी, वडगाव, तानपुरा, नांदगाव, माळेवाडी, भोसे, रुई गव्हाण, शिंदे, कोपर्डी. कुळधरण- कुलधरण, दुरगाव, धालवडी, राक्षसवाडी खू. राक्षसवाडी बु बारडगाव दगडी तळवडी जलालपुर. कोरेगाव- कोरेगाव, बजरंग वाडी, जळकेवाडी, लोणी, मसदपूर, थेरवडी, पिंपळवाडी, खादगाव, माळंगी निंबे, आंबे जळगाव, कुंभेफळ, बेनवडी, कोळवडी, तोरकडवाडी, देशमुख वाडी, चिलवडी, कोळपेवाडी, कानगुडेवाडी, सोनाळवाडी, आळसुंदे. राशिन : राशिन, परीटवाडी, बारडगाव सुद्रिक, कोपर्डी, कर्मनवाडी, वायसेवाडी, आखोणी, शिंपोरा, आवटेवाडी, खेड गणेशवाडी, भांबोरा, दुधवडी, सिद्धटेक. श्रीगोंदा- येळपणे : येळपणे, माठ उक्कडगाव, पिंपरी, कोलंदर, रायगव्हाण, राजापूर, राणेवाडी, ढवळगाव. कोळगाव : कोळगाव, चिखली, कोरेगाव, गोटेवाडी, सुरेगाव, उक्कलगाव, मुंगूसगाव, कोथुळ, पारगाव सुद्रिक, घारगाव, पिंपळगाव, पिसाविसापूर. मांडवगण- मांडवगण, महांडूळवाडी, तरडगव्हाण, चवर सांगवी, थेटे सांगवी, घोगरगाव, कामठी, रुईखेल, बांगरडे, बनपिंपरी ढोरजे, देऊळगाव, पिसोरे खांड, खांडगाव, तांदुळी दुमला, टाकळी लोणार, कोसेगव्हाण. आढळगाव- आढळगाव, कोकणगाव भावडी, हिरडगाव, घोडेगाव, गोठवी, वडाळी, सुरोडी, बेलवंडी, वडगाव, चांदगाव, पेडगाव, अधोरेवाडी, टाकळीकडे, वळीत, शेळगाव वेळू, चिकलठाणवाडी, चोराचीवाडी, आनंदवाडी. बेलवंडी- बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंबळे, हंगेवाडी, वांगदरी, मढेवडगाव, बोरी, शिरजगाव, बोडखा. काष्टी- काष्टी, सांगवी दुमला, निमगाव खलू, गार, कौठा, लिंपणगाव, अजनुज, आर्वी, म्हातारपिंपरी, बाबुर्डी.


