नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; विधान परिषदेचा उमेदवारच फोडला!कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूकहोणार आहे. आज निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध मतदारसंघात घडामोडी घडताना दिसत आहे. याचदरम्यान, कोकणात सगळ्यांत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेतील शिवसेना महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गट) उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यानंतर बाळ माने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी इंटरेस्टिंग ट्विस्ट निर्माण झाला.कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र आता कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या बाळ माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोकणातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. बाळ माने हे भाजपमध्ये होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बाळ माने यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यानंतर उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण बाळ माने यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles