गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नैसर्गिक शेतीचा संकल्प; मंत्री पंकजा मुंडे यांचा मशागतीत सहभाग
गोपीनाथगड, : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगड परिसरातील शेतीला भेट देऊन मशागतीच्या कामात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीचा संकल्प केला.
नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन
पंकजा मुंडे म्हणाल्या, “शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीची आवड निर्माण व्हावी आणि सर्वांनी पर्यावरणपूरक शेतीचा अवलंब करावा यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.” राज्याचे माजी राज्यपाल आणि नैसर्गिक शेतीचे प्रणेते आचार्य देवव्रत यांनी निर्माण केलेल्या ‘नैसर्गिक शेती मॉडेल’चा अवलंब आपल्या भागातील शेतकऱ्यांनी करावा, असा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. बाबांच्या स्मृतिदिनानिमित्त हा संकल्प असल्याचे त्या म्हणाल्या.
‘एक पेड पिता के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण
यावेळी ‘एक पेड पिता के नाम’ हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी वृक्षारोपण देखील करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी माजी खा. डॉ. प्रीतम मुंडे, चि. आर्यमन, चि. अगस्त्य यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.


