कुंभमेळा गर्ल मोनालिसाचा आणखी एक धक्कादायक खुलासा दिग्दर्शकावर गंभीर आरोप

अलिकडेच मोनालिसाने मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली.

मोनालिसाने चित्रपट दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

कुंभमेळा गर्ल वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे.

कुंभमेळा गर्ल लग्न झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत आहे. 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. या महाकुंभ मेळ्यात मोनालिसाने आपल्या डोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुंभमेळ्यात मोनालिसा रूद्राक्ष माळा विकायची. 11 मार्चला मोनालिसा भोसलेने महाराष्ट्रीयन मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खानसोबत पळून जाऊन लग्न केले आहे. आता मोनालिसाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. TOIच्या वृत्तानुसार, मोनालिसाने केलेल्या तक्रारीनंतर एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी एका चित्रपट दिग्दर्शकाविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले होते, असा आरोप तिने केला आहे. कुंभमेळ्यातील व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर, अभिनयाच्या संधी देण्याच्या बहाण्याने दिग्दर्शकाने तिचे शोषण केले, असा आरोपही तिने केला आहे.

एका अधिकाऱ्याने दिग्दर्शकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला; मात्र, या प्रकरणाबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. तसेच, ही घटना केरळ राज्याबाहेर घडली असल्याचेही सांगण्यात आले आहे. या तरुणीने एका दंडाधिकाऱ्यासमोर आपला गोपनीय जबाबही नोंदवला असल्याचे समजते.

यापूर्वी कोची येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत, संबंधित तरुणीने असा आरोप केला होता की, दिग्दर्शकाने तिला “१० वेळा” अयोग्यरित्या स्पर्श केला होता. “जेव्हा मी माझ्या कुटुंबाला या घटनेबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला नाही,” असेही तिने त्यावेळी म्हटले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles