या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जूनचा हप्ता, सोबतच मिळणार कर्ज

लाडकी बहीण योजना सुरु होऊन आता १ वर्ष पूर्ण होईल. ११ वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. दरम्यान, पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जून महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. या दिवसांत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याचसोबत लाडक्या बहि‍णींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरु करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की, सरकार लवकरच नवीन योजना सुरु करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ४०,००० रुपयांपर्यंतचे बँक लोन देईल. यामधून महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत.

लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेससंबंधित माहिती द्यावी लागणार आहे.

महिलांना जे १५०० रुपये मिळतात. त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे. जेणेकरुन महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही.महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.

महिलांचे वय हे २१ ते ६५ वयोगटातील असावे.

महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.

महिलांकडे कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे.

महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावे.

लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजना लाभ घेतलेला नसावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles