लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० की ३००० रूपये, महत्त्वाची अपडेट समोर

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालय, पण अद्याप १५०० रूपयांच्या हप्त्याबाबत अपडेट आलेली नाही. राज्यातील लाखो ‘लाडक्या बहिणींचे’ लक्ष जून-जुलैच्या हप्त्याकडे लागले आहे. जून महिना संपून नवा आठवडा उजाडला, तरी अजूनही महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे आता जूनचा हप्ता कधी येणार आणि तो नेमका किती असणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हा हप्ता १५ जुलैपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता १५ मे रोजी, तर मे महिन्याचा हप्ता १५ जून रोजी जमा करण्यात आला होता. याच चक्रानुसार आता जूनचा हप्ताही १५ जुलैच्या आसपास येण्याची दाट शक्यता आहे. त्याला दुसरे एक कारण म्हणजे, राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाते. तसा जीआर काढण्यात आलेला आहे.

यावेळच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणींना यावेळचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती आहे. केवळ १ कोटी ७० लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यातच हा हप्ता जमा केला जाईल. अपात्रता किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही महिलांना या योजनेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

सध्या महिलांमध्ये सर्वात मोठी चर्चा ही आहे की खात्यात नक्की किती पैसे येणार? पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर निधी मंजूर करून तो डीबीटी द्वारे थेट महिलांच्या खात्यात वर्ग केला जाईल.

दरम्यान, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र करून एकूण ३,००० रुपये जुलै महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. मात्र, दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार की फक्त जूनचाच हप्ता १५ तारखेला येणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता सरकार नक्की काय निर्णय घेते, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles